डोंगरकठोर्‍यात शेतमजुराची आत्महत्या


यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील एका शेतमजुराने विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली. भागवत बळीराम शिरोळे (55, धनगर, खालचे गाव डोंगरकठोरा, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.

विहिरीत उडी घेवून संपवले जीवन
रविवार, 13 जुनरोजी दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास खालचे गाव लगत शिवारातील शालिक रामचंद्र फिरके यांच्या शेतातील विहिरीत भागवत शिरोळे यांनी उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहरे काढण्यात आला. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत भागवत शिरोळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. यावल पोलिात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !