मुंबई आणि वाराणसी दरम्यान विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : रेल्वेने मुंबई आणि वाराणसी दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 04239 मुंबई-वाराणसी विशेष गाडी 14, 16 व 18 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दुपारी 11.50 वाजता सुटल्यानंतर वाराणसी येथे तिसर्‍या दिवशी पाच वाजता पोहोचेल. 04240 वाराणसी-मुंबई विशेष गाडी 15 व 17 रोजी वाराणसी येथून 7.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसर्या दिवशी 10.10 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि प्रयागराज छिवकी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, 12 शयनयान आणि 8 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !