वरणगाव पोलिसांनी जप्त केलेला गुटखा केला नष्ट
वरणगाव : वरणगाव पोलिसांनी काही दिवसापूर्वी विमल गुटका व विमल पान मसाला असा मुद्देमाल जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशाने 14 लाख 96 हजारांचा गुटखा पोलिस बंदोबस्तात वरणगाव नगरपरिषद डम्पिंग ग्राउंडवर पेट्रोल टाकून जाळून नष्ट करण्यात आला. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे , पोलीस कॉन्स्टेबल अजय निकम, ड्रायव्हर इस्माईल शेख , होमगार्ड गजानन चव्हाण होमगार्ड प्रदीप सुरवाडे व दोन पंच हजर होते .



