भुसावळात शिवसेनेतर्फे एमएचटी-सीईटी अर्ज नोंदणी सुविधा


भुसावळ : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएमएचटी-सीईटी-2021 ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे या दृष्टीकोनातून भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी विद्यार्थ्यांना ओम कॉम्प्युटर्स, विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नितीन माळी, प्रवीण चौधरी, जयेश चौधरी मार्गदर्शन करीत आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी 2021 ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 8 जून ते 7 जुलैपर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाच्या नोंदणीसाठी 8 ते 15 जुलै असा कालावधी दिला आहे. परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !