बीएसएफ निरीक्षक महेंद्र पाटील यांचा सन्मान


यावल : नॉर्थ ईस्ट (मेघालय आणि त्रिपुरा) येथे जवळपास चार वर्ष शांतता व सामान्य वातावरण राखण्याच्या दृष्टीने महानिदेशक, सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्वोत्तरच्या अती दुर्गम भाग असलेल्या मेघालय आणि त्रिपुरा येथे चार वर्ष शांतता निर्माण करण्यासह सामान्य वातावरण राखण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल विरावलीचे रहिवासी व बीएसएफ उपनिरीक्षक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा सीमा सुरक्षा बल टेकनपूरचे संयुक्त निदेशक /महानिरीक्षक राम अवतार (ग्वालियर) यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. पाटील यांना पोलिस अंतरीक सेवा पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पाटील यांचा सन्मान करण्यात आल्याने विरावली गाववासीयांची अभिमानाने मान उंचावली आहे. कार्यक्रमप्रसंगी उपमहानिरीक्षक के.एल.शाह, कमांडंट विक्रम कुंवर, द्वितीय श्रेणी कमांडिंग अधिकारी अरुणकुमार गंगवार व अन्य महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !