मुंबई-हटिया एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा धावणार
भुसावळ : गाडी क्रमांक 02811/02812 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया विशेष गाडी आठवड्यातून दोन वेळा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक 02811 विशेष गाडी 21 ते 28 जूनदरम्यान दर रविवारी आणि सोमवारी सुटणार आहे तर गाडी क्रमांक 02812 हटिया विशेष गाडी 19 ते 26 जूनदरम्यान दर शुक्रवारी आणि शनिवारी सुटणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.




