भुसावळात सट्टा खेळताना तिघांना अटक
भुसावळ : शहरातील कॉसमॉस बँकेजवळ सट्टा सुरू असल्याची माहिती शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एएसआय ईकबाल सैय्यद, हवालदार साहिल तडवी, कॉन्स्टेबल सोपान पंडित पाटील, पोलीस नाईक विकास यशवंत बाविस्कर आदींच्या पथकाने तिघांना ताब्यात घेत तीन हजार शंभर रुपये रोख, कल्याण मटक्याच्या 10 चिठ्ठ्या व बॉलपेन जप्त केला. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस नाईक विकास यशवंत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी अभिजीत दिलीप मराठे (40, न्यू सातारा, कॉसमॉस बँकेजवळ, भुसावळ), विजय रंगनाथ अय्यर (42, यू सातारा, कॉसमॉस बँकेजवळ, भुसावळ), अमजत शरीफ खान (26, मकरा अपार्टमेंट, शिवाजी नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




