भुसावळात पापा नगरात हाणामारी


भुसावळ : शहरातील पापा नगरात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्या चीघटना बुधवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पापा नगरात बुधवारी सकाळी शेख अमीन शेख मुनीर यांच्यात व शेख रहेमान शेख कालू व नाशिर मच्छरवाला यांच्यात वाद झाला. शेख अमीन यांच्यावर लोखंडी पाईपाने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेद्र पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !