वरणगाव भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी प्रणिता पाटील


कार्याध्यक्षपदी जयश्री संजीव ; नूतन कार्यकारीणीचे गठण

वरणगाव : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कार्यकारीणी बुधवारी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी प्रणिता पाटील-चौधरी तर कार्याध्यक्षपदी जयश्री संजीव अवतारे व उपाध्यक्षपदी कस्तुरा इंगळे, मंदाबाई थटार, फरीदाबी शेख नसीर, गणेरकर यांची निवड करण्यात आली.तसेच सरचिटणीसपदी भाग्यश्री पाटील, वर्षा बढे, चिटणीसपदी संगीता माळी, मीराबाई चव्हाण, मोनबी शेख उस्तफा, सुजाता वंजारी, मीनाक्षी पालवे, शेख फरीदा, भुमजाज बी. तर कार्यकारीणी सदस्य म्हणून रुपाली काळे यांची निवड करण्यात आली.

यांची उपस्थितीत जाहीर झाली कार्यकारीणी
माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, भाजपा खासदार रक्षा खडसे, माजी कृषी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य रुख्मिणी काळे, माजी नगरसेविका माला मेढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ए.जी.जंजाळे, सरचिटणीस गोलू राणे, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू ठाकरे ,आकाश निमकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !