केळी उत्पादकांना दिलासा : केळी पीक विम्याचे जुनेच निकष कायम


मुंबई : केळी उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा योजनेचे जुनेच निकष पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्यास राज्य सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. याबाबतचा आदेश राज्याचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केळी निकष जुनेच ठेवण्याची मागणी होत होती व या मागणीची पूर्तता झाल्याने केळी उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरवर्षी निर्माण होणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी बागा उद्ध्वस्त होऊन शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. अशा स्थितीत शेतकर्‍यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारच्या माध्यमातून पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्यावर्षी सरकारने या योजनेचे निकष बदलल्याने नैसर्गिक आपत्तीत केळीचे नुकसान होऊनही शेतकर्‍यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचे नवीन निकष बदलण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली होती

असे आहेत निकष-
कमी तापमान
1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सलग 3 दिवस किमान तापमान 8 अंश डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास हेक्टरी 26 हजार 500 रुपये नुकसान भरपाई.




वेगाचा वारा-
1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत 40 किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहून संदर्भ हवामान केंद्रावर तशी नोंद झाल्यास हेक्टरी 70 हजार नुकसान भरपाई.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !