पीएम किसान योजनेबाबत कृषी अधिकार्‍यांशी माजी नगराध्यक्ष चौधरींची चर्चा


रावेर : पी.एम.किसान योजने संदर्भात रावेर तालुक्याचे कृषी अधिकारी भामरे यांची भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी सोमवारी भेट घेवून चर्चा केली. किसान योजने संदर्भात शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणींबाबत प्रसंगी चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांची बँक खाती तातडीने अपडेट करावीत, अशी मागणी चौधरी यांनी प्रसंगी केल्यानंतर भामरे यांनी तातडीने बँक खात्यांचा तपशील अपडेट करून रावेर तहसील कार्यालयाला कळवण्याची ग्वाही दिली. संकटाच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा व मदत मिळणे अपेक्षित असून आपण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे अनिल चौधरी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !