भुसावळात भाजपा पदाधिकार्यांनी केली योगासने
भुसावळ : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पदाधिकार्यांनी लोणारी मंगल कार्यालयात योगासने केली. देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कपालभाती, वृक्षासन, भुजंगासन, मकरासन, शवासन, वॉर्मअप, मेडीटेशन, मन्डुकासन, ताडासन, चकरासन, त्रिकोणासन, नाडीशोधन प्राणायाम करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस संदीप सुरवाडे, डॉ.नीलेश पाटील, लक्ष्मण सोयंके, शैलजा पाटील, सतीश सपकाळे , नंदू बडगुजर, शिशिर जावळे, शंकर शेळके, डॉ.सनी जैन, गोपीसिंग राजपूत, संजय बोचरे, प्रशांत भट आदींसह भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी व परीसरातील नागरीक उपस्थित होते.



