फैजपूरात मसाका चेअरमन महाजनांच्या निवासस्थानाबाहेर ‘वंचित’चा ठिय्या


कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची संचालक मंडळाची लेखी ग्वाही

फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या विविध मागण्यांचा तिढा सोडवण्यासंदर्भात सोमवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे चेअरमन शरद महाजन यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण करू, असे लेखी आशसन संचालक मंडळाने दिले.

कामगारांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा
फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडल्याने कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. गेल्या चाळीस महिन्यांचा पगार थकीत असून पी.एफ.ची रक्कम देखील भरण्यात आलेली नाही शिवाय सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची देणी थकीत असल्याने न्याय मिळण्यासाठी सोमवारी वंचित आघाडीतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी कारखाना प्रशासनाकडे कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवार, 21 जून रोजी सकाळी दहा वाजता कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. संचालक मंडळाने कामगार वर्गाच्या मागण्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडून लवकरच त्याची पूर्तता करू, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.




यांचा आंदोलनात सहभाग
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, जिल्हा सचिव दीपक मेघे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, सचनि बार्‍हे, कामगार आघाडी चिटणीस बालाजी पठाडे, यावल तालुका उपाध्यक्ष भगवान मेघे, यावल तालुका महासचिव छोटु गवळी, फैजपूर शहराध्यक्ष सोनु वाघुळदे, विद्यासागर खरात, देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, कुणाल सुरडकर, विनोद तायडे, अर्जुन वाघ, सुरेश अटकाळे, गोलु अवसरमल, संम्यक इंगळे, अजय तायडे उपस्थित होते. दरम्यान, आंदोलन यशस्वीतेसाठी कामगार युनियनचे माजी अध्यक्ष गिरीष कोळंबे, उपाध्यश दामोदर कोळंबे, खजिनदार योगेश होले, कामगार कुमार पाटील, हमीद शाह, वसंत चौधरी, अरुण पाटील, मनमोहन महाजन, भानुदास पाटील, पुंडलिक माळी, जीवन फेगडे, शरद जावळे, राजेंद्र सोनवणे, सुनील अडकमोल, सुनील कोष्टी, संजय कोलते आदींनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !