रावेर तालुक्यात अवैध धंद्याविरोधात धाडसत्र
रावेर : अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी धाडसत्र राबवत गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त करीत मटका खेळणार्यांवर कारवाई केली. अहिरवाडी येथे संशयीत आरोपी योगेश सीताराम महाजन यास अवैधरीत्या गावठी दारू भट्टी चालवताना अटक करण्यात आली. 700 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली. दुसरी कारवाई तालुक्यातील अंजदा येथे करण्यात आली. नवीन निंबोल जाणार्या रस्त्यावर बुद्ध विहाराजवळील सावित्रीबाई देविदास सोनवणे (अजंदा) या गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने 900 रुपये किंमतीची दहा लिटर दारू जप्त करण्यात आली. तिसर्या कारवाईत खिरोद्यात संशयीत आरोपी जाबाज नथु तडवी हा गावठी दारू बनवत असल्याने पोलिसांनी कारवाई करीत 40 हजार रुपये किंमतीचे गावठीचे रसायन नष्ट केले.
मटका खेळताना कारवाई
रावेर शहरात गांधी चौक परीसरात आनंद तापीराम सोनवणे (38, संत रोहिदास नगर, तिरुपती टॉकीजजवळ, रावेर) यास कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार खेळताना पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 120 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.



