पीआरपीच्या आंदोलनाने यावल शहर दणाणले
किनगाव ग्रामपंचायतीतील दलित वस्ती निधी खर्च चौकशीची मागणी
यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायतीला प्राप्त दलित वस्ती सुधारणा निधीतून इतर ठिकाणी काम केले व वारंवार निवेदन देऊनही चौकशी केली नाही यासाठी सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, तालुकाध्यक्ष राहुल साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष रतन वानखेडे, शेख आरीफ, दिनेश मेढे, शैलेंद्र सैंदाणे आदींसह पीआरपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बीडीओ डॉ. नीलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. किनगाव खुर्द ग्रा.पं.ला सुमारे 20 लाखांचा निधी हा दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त झाला. त्यातून दलित वस्तीत विविध कामे होणे आवश्यक होते. मात्र तेथे काम न करता इतर ठिकाणी केली जात आहेत. कामे फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात जुन्या कामांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे या कामांची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात मागण्यांचा सर्व उहापोह करण्यात आला.




