स्वयंरोजगारकडे वळा, उद्योजक व्हा : आमदार संजय सावकारे
स्वयंरोजगारकडे वळा, उद्योजक व्हा : आमदार संजय सावकारे
भुसावळ : नोकरीच्या मागे न धावता तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे व यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले. प्रगती बहु उद्देशीय संस्था संचलित आदर्श हाय टेक प्रायव्हेट आय.टी.आय आणि रावेर येथील महाजन प्रायव्हेट आय.टी.आय.यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श हायटेक प्रा.आय.टी.आय., कुर्हेपानाचे येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य डॉ.वसंतराव झारखंडे होते. प्रसंगी उद्योजक गुड्डू अग्रवाल, संस्थाध्यक्ष कैलास महाजन, शिवाजी पाटील, प्रसाद बोकाडे, गजेंद्र महााजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी कैलास महाजन म्हणाले की, आपली संस्था नेहमी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहील आणि तंत्र शिक्षणात आमच्या आयटीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. रोजगार मेळाव्यात यशस्वी ग्रुपतर्फे प्रसाद बोकाडे यांनी मुलांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेतल्या व 150 बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन महाजन आय.टी.आय.चे प्राचार्य ए.बी.तडवी यांनी केले तर आभार आदर्श हायटेक आय.टी.आय.चे प्राचार्य एस.के.कुरेशी यांनी मानले. रोजगार मेळावा यशस्वीतेसाठी दोन्ही आय.टी.आय.मधील निदेशक तथा कर्मचार्यांनी परीश्रम घेतले. प्रसंगी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, संस्थेचे संचालक प्राजक्त पाटील, गजेंद्र महाजन आणि संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यासाठी आर.बी.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.



