भुसावळातील रोडरोमिओंवर आता निर्भया पथकाची नजर
छेडखानीला बसणार आळा : तरुणींसह पालकांमधून समाधान
भुसावळ : शहरातील रोडरोमिओंच्या उच्छाद आता थांबणार असून नागरीकांच्या तक्रारीनंतर भुसावळातनिर्भया महिला सुरक्षा पथकाची स्थापना डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी करण्यात आली. या पथकात महिला आणि पुरूष पोलिस मिळून आठ जणांचा समावेश आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या भोवती या पथकाकडून आता गुरुवारपासून कारवाई केली जाणार आहे.
वाहनाद्वारे गस्त घालून होणार कारवाई
निर्भया पथकाला स्वतंत्र वाहन (एम.एच.19 एम. 0668) देण्यात आले असून पथकातर्फे शहरातील शाळा, कॉलेज तसेच खासगी क्लासेस, टवाळखोर मुले थांबत असलेली ठिकाणे शोधून तेथे दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहावाजेपर्यत गस्त घालून कारवाई केली जाणार आहे. शिवाय या पथकाकडून ट्रीपलसीट मोटर सायकल चालवणार्यांसह कर्कश हॉर्न वाजविणारे वाहन चालक, फॅन्सीनंबर प्लेट असलेली वाहने, विनाकारण शाळा, कॉलेजच्या परिीसरात वेगात गाड्या चालविणार्यांविरूध्द कारवाई करणार असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले.