बंद घर चोरट्यांना संधी : बोदवडमध्ये 45 हजारांचा मुद्देमाल लंपास


बोदवड : घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्यावर पडली व 45 हजारांची घरफोडी झाली. शिक्षक जगन तुळशीराम क्षीरसागर (49, रा. चिखली, ता.मुक्ताईनगर, ह.मु. हेडगेवार नगर, जळगाव) हे शिक्षक असून मंगळवार. 22 जून रोजी ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधत कपाटातील 10 हजारांची रोकड, 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि 10 हजार रूपये किंमतीचे चांदी असा एकुण 45 हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवला. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !