अपघातातील जखमीला अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी दिला मदतीचा हात


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील त्रिशुल (विकी) मराठे हा युवक भुसावळ वरून मुक्ताईनगर येथे दुचाकीवरून येत असताना बोहर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. याचवेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर या त्या मार्गाने जात असताना त्यांनी मुक्ताईनगर येथून रुग्णवाहिका बोलावून विकी मराठे यांना पुढील उपाचारासाठी भुसावळ येथे रुग्णालयात रवाना केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र माळी, शिवराज पाटील व बोहर्डी ग्रामस्थांनी मदत केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !