भुसावळात रोटरी प्रांतपालांच्या हस्ते नूतनीकरण हॉलचे उद्घाटन


भुसावळ : शहरात रोटरी 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी त्यांच्याहस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या रोटरी हॉलचे उद्घाटन करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धानासाठी शब्बीर शाकीर यांच्याहस्ते व सौ.जुमानाजी यांच्याहस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी डिस्ट्रीक सचिव टॉबी भगवानगर, अतुल शाह यांची उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांचे स्वागत केले.

प्रथमच चारही क्लब आले एकत्रीत
भुसावळच्या इतिहासात प्रथमच चारही रोटरी क्लब एकत्रीत आल्याचे कार्यक्रमात दिसून आले. या नाविण्यपूर्ण बाबीचे अनेकांनी कौतुक केले. रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष रो.गजानन ठाकूर यांनी क्लबचा वार्षिक अहवाल सादर केला. तत्कालीन रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्ष रो.संदीप जोशी यांनी आपल्या क्लबचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे रो.अध्यक्ष सुधाकर सनांसे यांनी आपल्या क्लबचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सचे रो.अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी त्यांच्या क्लबचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रसंगी रो.पांडुरंग राव यांना शब्बीर शाकीर यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सचे सचिव राजेंद्र यावलकर यांनी शब्बीर शाकीर यांची ओळख करून दिली.




रोटरीचा समाज सेवेचा वसा : शब्बीर शाकीर
याप्रसंगी रोटरी राज्यपाल शब्बीर शाकीर म्हणाले की, रोटरी आपल्यातील मानवी भावना जागृत करून आपल्या चारीत्र्याचे विकास करते आणि समाज सेवेचे पोषण करते शिवाय लोकांना नीतिशास्त्र, मानवता आणि सेवा भाव वाढण्यास मदत करते. रोटरी जागतिक समज आणि शांततेसाठी अधिक सकारात्मक वातावरण तयार करते, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भुसावळच्या चारही रोटरी क्लबचे कौतुक केले. सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सचिव  रो.गिरीश कुलकर्णी यांनी करून आभारही मानले. रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे सचिव संजय भटकर,  पूर्वा ठाकूर यांनी स्वागत गीत म्हटले. प्रसंगी राजीव शर्मा, रश्मी शर्मा, धर्मेंद्र मेंडकी, योगेश भोळे, लोकेश कंसल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा  शीतल भराडे, श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष अप्पा सोनवणे, श्री जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष विजय चौधरी, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष शुभम ढोपे, डॉली दुधनी आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !