भुसावळात वटसावित्री पौर्णिनिमित्त महिलांना भेटवस्तूचे वाटप


भुसावळ : वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून भुसावळातील नगरसेवक युवराज लोणारी व भाजपा महिला शहराध्यक्ष मीना लोणारी यांनी प्रभागातील 500 महिला भगिनींना तांब्याचा कलश देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आमदार संजयभाऊ सावकारे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी जिल्हा सरचिटणीस शैलजा पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी भेट दिली. भाजपा महिला शहराध्यक्ष मीना लोणारी व गौरव लोणारी यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !