बारावी निकालात दहावी मार्कांचा बेस धरावा


कनिष्ठ प्राध्यापक संघटनेची मागणी बोर्डाकडे मागणी

भुसावळ : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही परंतु सीबीएससी पॅटर्न प्रमाणे इयत्ता 12 वीचे गुणदान करत असताना इयत्ता दहावीला 30 टक्के, इयत्ता अकरावीला 30 टक्के व इयत्ता 12 वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के ही त्रिसूत्री महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने व राज्य परीक्षा महामंडळाने स्वीकारावी, अशी मागणी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेने केली आहे.

मार्गदर्शक तत्व ठरवतांना दहावीच्या गुणांना महत्व द्यावे
विद्यार्थ्यांना गुणदान करताना दहावीला बेस म्हणून बारावीचे गुणदान केले जावे कारण दहावीची परीक्षा बोर्डाची परीक्षा असते आणि तेच विद्यार्थी यावर्षी बारावीच्या वर्गात आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या दहावीच्या एकूण गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दहावीचे मार्क्स त्यांचे मेहनतीचे व कष्टाचे आहेत अशा मार्कांना वगळून केवळ अकरावी व बारावीच्या आधारावर गुणदान अंतर्गत मूल्यमापन करून इयत्ता बारावीचा निकाल लावणे योग्य होणार नाही. यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्व ठरवतांना इयत्ता दहावीच्या गुणांना विशेष महत्त्व द्यावे, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाकडे व राज्य परीक्षा महामंडळाकडे जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सरचिटणीस शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.अतुल इंगळे यांनी राज्य महासंघाकडे व शालेय शिक्षण विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य परीक्षा महामंडळाचे अध्यक्ष, शिक्षण आयुक्त व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री व पदवीधर शिक्षक आमदारांना निवेदन दिले आहे. आमदार सुधीर तांबे या संदर्भात महासंघाच्या पदाधिकार्‍यांना घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधणार आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !