वरणगावच्या तनिष्क भैसेचे कलाकृतीने देशभरात नाव होणार
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीणकुमार मुंढे : स्वतःच्या क्ले मॉडेलमुळे भारावले व तनिष्कला कौतुकाची थाप दिली*
वरणगाव : सहकार आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद देविदास भैसे यांचा एकूलता एक आठवीतील चिरंजीव तनिष्क मिलिंद भैसे याने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे उभेहुब क्ले मॉडेल तयार केले ते क्ले मॉडेल जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना भेट दिले. यावेळी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, संतोष कश्यप, तनिष्कचे वडील मिलिंद भैसे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंझे भारावले व माझे हुबेहुब क्ले मॉडेल व स्केच बालकलाकार वरणगावचे तनिष्क भैसे हा कमी वयातला मुलगा तयार करू शकतो हे पाहून मला आनंद वाटला. तनिष्क हा छोट्या वयात महापुरुष देवदेवतांचे मातीचे पुतळे तयार करतो करीत असून तो देशभरातील मोठा कलाकार होईलच, असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला.




