भुसावळ-बांद्रा टर्मिनस (खान्देश) एक्स्प्रेसला मुदतवाढ
भुसावळ : 09014 भुसावळ-बांद्रा टर्मिनस व 09013 बांद्रा टर्मिनस भुसावळ खान्देश) एक्स्प्रेसला 29 जुनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्य स्थानकांदरम्यान कोरोना नियमांचे पालन करावे लागेल शिवाय विशेष गाड्यांमध्ये चढण्यासाठी फक्त कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी असेल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.




