भुसावळातील पादचारी पुलाचे काम मार्गी लावणार


रेल्वे प्रशासनाची ग्वाही : भुसावळ शहरात रेल्वे सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना औषधी साठा मिळण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक दखल घेण्यात येईल तसेच रेल्वे स्थानकावरील जुन्या एफओबीचे संथ गतीने सुरू असलेले काम आता 15 दिवसात काम मार्गी लावू, अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने रेल्वे सल्लागार समितीची 166 व्या बैठकीत शुक्रवारी दिली. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांनी एफओबीचे संथ गतीने सुरू असलेले काम व रेल्वे स्थानकावर औषध सुविधा उपलब्धी संदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर त्याबाबत प्रशासनाने सकारात्मक दखल घेण्याचे आश्‍वास दिले. नूतन सदस्य अनिरूद्ध कुलकर्णी यांनी भुसावळ बसस्थानकासमोरील रस्त्याचा प्रश्‍न मांडल्यानंतर ही बाब पालिकेच्या अखत्यारीतील असल्याचे सांगत संबंधिताशी रस्ता काम करण्यासाठी चर्चा करण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली.

यांचा ऑनलाईन बैठकीत सहभाग
या बैठकीत डीआरएम विवेक कुमार गुप्ता, अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ मंडल परीचालन प्रबंधक आर.के.शर्मा, मंडल वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, वरीष्ठ मंडल अभियंता (समन्वय) तरुण दंडोतिया, मंडल सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव, मंडल रेल उपभोग कर्ता सलाहकार समितीचे सदस्य हे ऑनलाईनद्वारे सहभागी झाले.




या सदस्यांचाही सहभाग
राहुल गोयंका (अकोला), वसंत कुमार बाछुका (अकोला), जुगलकिशोर कोठारी (अकोला), राजनारायण मिश्रा (अकोला), प्रवीण सावळे (अमरावती), नितीन मधुकर बोरेकर (अमरावती), विलास नामदेवराव वाडेकर (बडनेरा), अयुब खान मुस्तफाखान (बडनेरा), राजेंद्र डांगे (बडनेरा), अनिरुद्ध कुलकर्णी (भुसावळ), परीक्षीत बर्‍हाटे (भुसावळ), विजय गुप्ता (बर्‍हाणपूर), राजेंद्र जोशी (बर्‍हाणपूर), पवन लाथ (बर्‍हाणपूर), डॉ.विजय धांडे (सावदा), संजय पवार (चाळीसगाव), डॉ.योगेश हेमंतराव सूर्यवंशी (धुळे), वैशाली विजय आडके (इगतपुरी), प्रवीण पगारीया, विनायक पाटील (जळगाव), राजेंद्र पंडित सोनवणे (जळगाव), चंद्रकांत कासार (जळगाव), अमोल देविदास जाधव (जळगाव), हरीश कोटवाले (खंडवा), राम गुलाम सोनी (खंडवा), त्रीलोक पटेल (खंडवा), राजेंद्र बाळकृष्ण चाफेकर (लासलगाव), महेंद्रकुमार बुरड (मलकापूर), पंकज खताळ (मनमाड), गुरमीत सिंग रावल (नाशिक), राजेंद्र फोकणे (नासिक), पवन रमेश भगुरकर (नाशिक), रवि कुमार मलानी (नेपानगर), दिवाकर लक्ष्मण शिंदे (शेगाव), शिवाजी गोंदकर (शिर्डी), नितीन दिनकर (बेलापूर) आदी सदस्य सहभागी झाले. सूत्रसंचालन वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील तर मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार यांनी आभार मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !