यावलला रस्ता रोको : राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी


यावल : राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच ओबीसी आरक्षण गेल्याची जोरदार घोषणाबाजी करीत भाजपा पदाधिकार्‍यांनी शहरातील भुसावळ टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन केले. ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपच्यावतीने ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे , पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी सहभागी झाले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !