भुसावळातील प्रभाग 12 मधील रस्त्याने 30 वर्षांनंतर टाकली कात
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील डी.एल.हिंदी हायस्कूल ते पटेल भजेवलापर्यंत मुख्य रस्ता तब्बल 30 वर्षानंतर कात टाकणार असून रखडलेल्या कामाचे शनिवारी नगरसेविका पूजा राजु सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांनी व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भाळे यांच्या सहकार्याने डांबरीकरण होत आहे. शनिवारी रस्ता कामाचे उद्घाटन नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ठेकेदार, शिवाजी नगरारातील नागरीक तसेच आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी उपस्थित होते. दरम्यान, रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त करीत लोकप्रतिनिधींना धन्यवाद दिले आहेत.




