वरणगावात भाजपा पदाधिकार्यांनी महामार्ग रोखला
वरणगाव : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने शनिवारी सकाळी 10.30 वाजता नवीन महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. पदाधिकार्यांना वरणगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर काही वेळानंतर त्यांची सुटका केली.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, शहराध्यक्ष सुनील माळी, महिला आघाडी शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, जिल्हाध्यक्ष विवेक शिवरामे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, इरफान पिंजारी, डॉ.सादिक, माजी सरपंच सुभाष वाघ, सरचिटणीस गोलू राणे, भाजपा शहर उपाध्यक्ष युसूफ खान, नटराज चौधरी, हितेश चौधरी, कृष्णा माळी, संदीप माळी, गजानन वंजारी, डॉ.प्रवीण चांदणे, गंभीर आण्णा माळी, किरण वंजारी आदी सहभागी झाले. आंदोलन यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे योगेश माळी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, सिद्धार्थ राजेंद्र चौधरी, पप्पू ठाकरे, साबीर कुरेशी, तेजस जैन, राहुल जंजाळे, कमलाकर मराठे, जयेश कपाटे, प्रशांत बावणे, दीपक चौधरी, भूषण चौधरी, गणेश चौधरी, शंकर पवार, शाम सुरडकर व कस्तुराबाई इंगळे , माला मेढे आदींनी परीश्रम घेतले.




