मुंबईसह लखनऊ, गोरखपूर, हावडादरम्यान विशेष गाड्यांना मुदतवाढ


भुसावळ : अनलॉकनंतर रेल्वे गाड्यांना गर्दी वाढल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईसह लखनऊ, गोरखपूर, हावडादरम्यान धावणार्‍या विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ जंक्शन विशेष गाडीला 3 जुलै ते 30 ऑक्टोबरपर्यंत, 02108 लखनऊ जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला 4 जुलै ते 31 ऑक्टोबरपर्यंत, 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीला 1 जुलै ते 28 ऑक्टोबरपर्यत, 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला 2 जुलै ते 29 ऑक्टोबरपर्यंत, 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीला 8 जुलै ते 28 ऑक्टोबरपर्यंत, 01080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 10 जुलै ते 30 ऑक्टोबरपर्यंत, 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष गाडी 2 जुलै ते 30 ऑक्टोबरपर्यंत, 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला 4 जुलै ते 1 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.




पुण्यासह दरभंगा, लखनऊ, गोरखपूर, मंडुआडीह दरम्यानच्या गाड्यांनाही मुदतवाढ
01033 पुणे-दरभंगा विशेष गाडीला 7 जुलै ते 27 ऑक्टोबरपर्यंत, 01034 दरभंगा-पुणे विशेष गाडीला 9 जुलै ते 29 ऑक्टोबरपर्यंत, 01407 पुणे- खनऊ जंक्शन विशेष गाडीला 6 जुलै ते 26 ऑक्टोबरपर्यंत, 01408 लखनऊ जंक्शन-पुणे विशेष गाडीला 8 जुलै ते 28 ऑक्टोबरपर्यंत, 01115 पुणे-गोरखपूर विशेष गाडीला 6 जुले ते 28 ऑक्टोबरपर्यंत, 01116 गोरखपूर-पुणे विशेष गाडीला 10 जुलै ते 30 ऑक्टोबरपर्यंत, 02135 पुणे-मंडुआडीह विशेष 5 जुले ते 25 ऑक्टोबरपर्यंत, 02136 मांडुआडीह-पुणे विशेष गाडीला 7 जुलै ते 27 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

अन्य विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
09271 बांद्रा टर्मिनस-पटना विशेष गाडीला 28 जुन ते 30 ऑगस्टपर्यंत, 09272 पटना-बांद्रा टर्मिनस विशेष गाडीला 30 जुन ते 30 ऑगस्टपर्यंत, 02913 बांद्रा टर्मिनस-सहरसा विशेष गाडीला 27 जुन ते 29 ऑगस्टपर्यंत, 02914 सहरसा-बांद्रा टर्मिनस विशेष गाडीला 29 जुन ते 31 ऑगस्टपर्यंत, 02905 ओखा-हावडा विशेष गाडीला 27 जुन ते 29 ऑगस्टपर्यंत, 02906 हावडा-ओखा विशेष गाडीला 29 जुन ते 31 ऑगस्टपर्यंत, 09205 पोरबंदर-हावडा विशेष गाडीला 30 जुन ते 29 ऑगस्टपर्यंत, 09206 हावडा-पोरबंदर विशेष गाडीला 2 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत, 09057 उधना-मंडुआडीह गाडीला 25 जुन ते 27 ऑगस्टपर्यंत, 09058 मंडुआडीह-उधना विशेष गाडीला 27 जुन ते 29 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !