हद्दपारी आदेशाचे उल्लंघण : आरोपीला अटक
जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानाही शहरात तळ ठोकून असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राहुल रामचंद्र बर्हाटे (27, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विविध गुन्ह्यांमुळे आरोपीस जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते मात्र आरोपी 21 दिवसाच्या आतच पुन्हा शहरात आल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली.




