आदिवासी पाड्यावर अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
यावल : अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना 23 जून रोजी घडली. बालिकेने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सोमवारी या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सातपुड्याच्या कुशीतील जामुनझिरा आदिवासी पाड्यावर नात्याने चुलत आत्याच्या नवर्याने भाचीवरच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 23 जून रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडीतेच्या आईने यावल पोलिसात तक्रार दिली. संशयीत आरोपी रमा देवसिंग बारेलाने 23 जून रोजी बालिकेला एका खोलीत नेत अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र याचवेळी बालिकेने आरडा-ओरड केल्याने आरोपी पसार झाला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.




