पत्रकार राजेश पोतदार यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
भुसावळ : शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजेश पोतदार यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीतर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय मानवाधिकार या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले यांच्या महाराष्ट्र दौर्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात नुकताच मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकार्यांचा कार्यक्रम झाला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.शिवचरण उज्जैनकर, के.एम.टी.व्ही.चे सह संचालक श्रीकांत शहारे, महिला कर्मचारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजु भटकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोतदार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश सैनी, जळगाव जिल्हा सचिव प्रा.राजकुमार कांकरीया, जळगाव जिल्हा महासचिव हकीम आर.चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, तालुका संघटन सचिव विनोद खराटे, गणेश कोळी यांची विशेष उपस्थिती होती.



राजेश पोतदार यांचा सत्कार
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोतदार यांनी मानवाधिकार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्याहस्ते त्यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.दहिवले यांच्या हस्ते राजेश सैनी यांचा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी संजु भटकर यांनी प्रास्ताविकात संघटनेविषयी विचार व्यक्त केले. राष्ट्रीय संघटन सचिव डॉफशिवचरण उज्जैनकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. डॉ.मिलिंद दहिवले यांनी संघटनेच्या मानव अधिकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुवर्णलता अडकमोल यांना खान्देश रणरागिणी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश पोतदार आणि जिल्हा सचिव प्रा.राजकुमार कांकरीया यांनी सूत्रसंचालन तर संजू भटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी विवेक सैनी, भूषण आंबोडकर, हर्षल गोराडकर, किशोर बर्हाटे, अॅड.कल्पना टेमाणी, प्रांजल पाटील, संतोष यादव आदी उपस्थित होते.

