भुसावळातील प्रभाग 15 मध्ये नागरीकांचे आरोग्य धोक्यात
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये समस्यांनी नागरीक जर्जर झाले असून विविध समस्या सोडवण्यासंदर्भात भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेवून निवेदन सादर करण्यात आले.
समस्या सोडवण्याची अपेक्षा
प्रभाग 15 मधील मटण मार्केटजवळ असलेल्या शौचालयाची दुरवस्था थांबवावी, नाल्यावर तुटलेल्या भिंतीची दुरुस्ती करावी, रस्त्यांची समस्या सोडवावी तसेच नियमित या भागात घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. काँग्रेस कमेटी वरील समस्यांची सोडवणूक होण्यासाठी 2017 ते 2021 पासून सातत्याने पाठपुरावा करीत असताना स्थानिक पालिका प्रशासन मात्र दखल घेत नसल्याचे दुर्दैव आहे.



आठ दिवसात समस्या सुटण्याची अपेक्षा
याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी येत्या आठ दिवसात शौचालयाची समस्या सुटण्याचे आश्वासन दिले तसेच 1 जुलैपासून प्रभागात घंटागाडी सुरू करण्याची तसेच रस्ता कामाची ग्वाहीदेखील दिली. आर.के.किताब घर ते डी.एल.हिंदी स्कुलपर्यंत मुरूम पावसाळ्यात नागरीकांना दिलासा दिला जाणार आहे.दरम्यान, वरल समस्यांसह अन्य समस्यांचा निपटारा न झाल्यास काँग्रेस कमेटीतर्फे नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्या आला आहे. निवेदन देताना काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान, शहराध्यक्ष सलीम गवळी, जगपाल सिंह गील, शहर सचिव हमीद शेख, जॉनी गवळी उपस्थित असल्याचे शहराध्यक्ष सलीम गवळी कळवतात.

