रेल्वे हॉस्पिटलमध्ये दुसरा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित


भुसावळ : भुसावळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये दुसरा ऑक्सिजन प्लांट मंगळवारी कार्यान्वित करण्यात आला. मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ऑक्सिजन प्लांट आणि ऑल बॉडी एक्स रे मशीनचे उद्घाटन करण्यात आले. 500 लिटर प्रति मिनिट ऑक्सीजन निर्मितीची या प्रकल्पाची क्षमता आहे. मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.एस.के.मांडवी, डॉ.एस.के.अंबुस्कर यांच्या निरीक्षणात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली. याप्रसंगी अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.एस.के.मांडवी, डॉ.एस.के.अंबुस्कर व अन्य शाखांचे अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !