अज्ञात दुचाकीच्या धडकेत भुसावळातील दाम्पत्य जखमी


भुसावळ : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने भुसावळातील दाम्पत्य जखमी झाले. 26 रोजी दुपारी 12 वाजता राहुल नगराजवळ हा अपघात झाला. शहर पोलिसात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार संजय आनंदा कोटेचा-जैन (कॉसमॉस बँकेजवळ, सातारा फाईल, भुसावळ) हे पत्नी चंदन व मुलगा युगसह दुचाकी (एम.एच.19 सी.ए.8198) ने तापी नदीकडे फिरायला निघाले असताना समोरून येणार्‍या अज्ञात भरधाव दुचाकीने जैन यांच्या दुचाकीला धडक दिल्याने संजय जैन यांना मुका मार लागला तर पत्नी चंदन या जखमी झाल्या व दुचाकीचेही नुकसान झाले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !