भुसावळात 1 जुलैपासून दावते इस्लामी वृक्षारोपण मोहिम राबवणार


भुसावळ : दावत-ए-इस्लामी हिंद येत्या 1 ते 7 जुलै दरम्यान भुसावळ शहरात वृक्षारोपण मोहिम राबवणार आहे. दावते इस्लामिक हिंदचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांनी भुसावळातील जाम मोहल्ला परीसरात कांजुल सभागृहात याबाबत बैठक घेतली. शेख यांनी सांगितले की, प्रत्यक्षात संपूर्ण भारतसह जळगाव जिल्ह्यात ही मोहीम राबविली जाईल. देशातील वाढत्या लोकसंख्येमध्ये इमारती आणि उद्योगांच्या बांधकामादरम्यान झाडे तोडली जात आहेत आणि ती पुन्हा न लावल्यामुळे प्रत्यक्षात वातावरण प्रदूषित होत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या सर्व बाबींची दखल घेत वृक्षारोपण मोहिम राबवली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !