पत्नीसह दोघा मुलांना सोडून पती दुसर्‍या महिलेसोबत पसार


यावल : तालुक्यातील नायगाव येथे शासकीय सेवेत असलेल्या एकाने पत्नी व दोन मुले सोडून सावखेडासीम येथील एका दोन मुलांच्या आईस घेऊन पोबारा केला. याबाबत संबंधिताच्या पत्नीने यावल पोलिसांत पती व त्या महिलेविरुद्ध तक्रार दिली. नायगाव येथील शबनम तडवी (30) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसा, तिचे पती अशरफ हुसेन तडवी हे सोमवारी सावखेडासीम येथील दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेला सोबत घेऊन कुठे तरी निघून गेले. याबाबत शबनम तडवी यांनी पती अशरफ यांना मोबाइलवर कॉल करून झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. मात्र, पती अशरफ व संबधित महिलेने त्यांना शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. संबंधित अशरफ तडवी हे शासकीय सेवेत असल्याचे तक्रारदार विवाहितेने सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !