मुंबई आणि हावडा दरम्यान विशेष ट्रेन धावणार
भुसावळ : रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आणि हावडा दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. विशेष क्रमांक 02470 ही गाडी हावडा येथून 2 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक शुक्रवारी 2.35 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मुंबईला 11 वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्रमांक 02469 छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई येथून 4 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक रविवारी 11.05 वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्या दिवशी 7.30 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर स्थाकनावर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




