कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकडे
भुसावळ : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बंधू भगिनींचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून सीएमपी प्रणालीद्वारे व्हावे, अशी मागणी खान्देश दौर्यावर आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भैय्या उपस्थित होते. प्रसंगी शासनाने जी प्रॉव्हिडंट फंडाची बीडीएस प्रणाली गेल्या मार्च पासून बंद केली असून शासनाने ही वेबसाईट सुरू करावी, असा आग्रह संघटनेच्या पदाधिकार्यांनी धरला. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव प्रा.शैलेश राणे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.भारुडे, प्रा.प्रशांत वंजारी, विनाअनुदानित कृती समितीचे प्रा.अनिल परदेशी, प्रा.महाजन यांनी केले.




