रीपाइंतर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने


फैजपूर : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रावेर तालुक्यातील प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, रावेर तालुकाध्यक्ष विकी तायडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी कमलाकर गाढे, विष्णू पारधे, अक्षय गाढे, किरण भीमराव तायडे, हसन तडवी आदी लखन इंगळे, विनोद मोरे, राजू तडवी, सावळे, प्रदीप गाढे, किरण ढिवरे आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !