भुसावळात रेल्वे रोकोपूर्वीच संविधान आर्मी कार्यकर्त्यांना रोखले


उद्या मुंबईत आंदोलन : भुसावळात कार्यकर्त्यांना अटक व सुटका

भुसावळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाचे संविधान असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी खान्देशातील 11 रेल्वे स्थानकावर 30 जुलै रोजी दुपारी दोन वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. भुसावळात आंदोलनासाठी संविधान आर्मीचे कार्यकर्ते राकेश बग्गन यांच्यासह पदाधिकारी निघाल्यानंतर त्यांना रेल्वे स्थानकाबाहेरच रेल्वे सुरक्षा बलाने रोखत ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक व रेल्वे सुरक्षा बलात काही वेळ वादंगही झाला. यानंतर कार्यकर्त्यांना बाजारपेठ पोलिसांना ताब्यात देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात एकाचवेळी 11 ठिकाणी आंदोलन करण्यात आले मात्र काही ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक झाली तर काही ठिकाणी आंदोलन यशस्वी झाले, असे माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी सांगितले.

मुंबईत आज आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाचे संविधान असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संविधान मोर्चा 1 जुलै रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे. संविधान मोर्चा नेतृत्व संविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन सोनवणे व नगरसेविका संविधान आर्मी महिला आघाडी प्रमुख पुष्पा जगन सोनवणे करणार आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !