भुसावळातील रस्त्यांसह पाण्याची समस्या सोडवा : एमआयएमची मागणी


भुसावळ : शहरातील खडका रोड, जाम मोहल्ला, नसरवांजी फाईल, मोहम्मदी नगर, पाटील मळा, गौसीया नगर, आगाखान वाडा, काझी प्लॉटसह अन्य भागात पाण्याची समस्या सोडवावी तसेच गटारींची नियमित स्वच्छता करावी, रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी एमआयएमतर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देवून करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुकाध्यक्ष अशरफ तडवी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देतेसमयी तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, जिल्हा महासचिव कलीम शेख, शहराध्यक्ष शोएब बागवान, युवा जिल्हाध्यक्ष नावीद खान, युवा तालुकाध्यक्ष नदीम खान, युवा शहराध्यक्ष इलियास पटेल, तालुका महासचिव अफजल खान यांच्यासह कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !