साईनगर शिर्डी-हावडा विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : 02593 साईनगर शिर्डी-हावडा विशेष गाडीला 3 ते 31 जुलैपर्यंत तसेच 02594 हावडा-साई नगर शिर्डी विशेष गाडीला 1 ते 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.




