जळगावात चाकूच्या धाकावर दोघा विद्यार्थ्यांना लुटले


जळगाव : हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर मेहरुण तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (19,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) दोघा विद्यार्थ्यांना तीन संशयितांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोकड लुटल्याची घटना बुधवराी रात्री 8.30 वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यश व त्याचा मित्र नरेश हे दोघं जण बुधवारी सायंकाळी शिरसोली रस्त्यावरील हॉटेलवर यशच्या दुचाकीने (क्र.एम.एच.19 सी.एल. 6593) जेवणासाठी गेले होते. रात्री साडेआठ वाजता जेवणानंतर घराकडे परततांना मेहरुण तलावाकडे जाणार्या रस्त्यावर थांबले. या ठिकाणी गप्पा मारत असताना समोरुन आलेल्या 20 ते 25 वयोगटातील तीन जणांनी यश व नरेश या दोघांना धक्काबुक्की करत धमकावत खिशातून व बळजबरीने मोबाईल व पाकीट काढून घेतले. त्यानंतर यशच्या डिक्कीतील मोबाईल हिसकावला दोघांजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये असा 28 हजार 500 रुपयांचा ऐवज हिसकावून कोणाला सांगितले तर चाकूने मारुन टाकेल, अशी धमकी देत आल्या रस्त्याने पसार झाले. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.


कॉपी करू नका.