भुसावळ रेल्वे विभागातील 91 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : रेल्वेतील प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून 30 जून रोजी 91 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्यांच्या बँक खात्यात तत्काळ 27 कोटी रुपये ऑनलाईन वर्ग करण्यात आले . सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे प्रतिनिधी म्हणून खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, मुर्तिजापूर, बडनेरा, मनमाड, अकोला आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोल्डर दिलेत. मंडल रेल प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचार्यांना वरीरष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्याहस्ते पी.पी.ओ फोल्डर देण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. सेवानिवृत्तीबद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता व अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्तीबद्दल मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. आभार मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप खरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षकांनी परीश्रम घेतले.




