पाळधीतून म्हशीची चोरी करणार्‍या चोपड्याच्या आरोपीला बेड्या


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव : पाळधीचे शेतकरी सैय्यद अली कादर अली (48, रा.गोविंद नगर, पाळधी) यांच्या मालकिची आठ महिने गर्भवती असलेली म्हैस 27 रोजी पहाटे चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी गोपनीय माहितीवरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रतीलाल राजाराम भोई (33, रा.साने गुरुजी वसाहत, चोपडा) यास अटक करून त्यास धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक, भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात हवालदार विजय पाटील, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.