रावेरातील पुरवठा प्रकरणाची पंधरा दिवसात चौकशी होणार पूर्ण : प्रांताधिकारी कैलास कडलग


रावेर : रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाची चौकशी येत्या 15 दिवसात पूर्ण होणार असून याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी तथा चौकशी अधिकारी कैलास कडलग म्हणाले. शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची बदली केली होती. आतापर्यंत या प्रकरणात रावेर तालुक्यातील सुमारे 148 रेशन दुकानदारांचे जबाब मंडळ अधिकार्‍यांमार्फत नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात अजुन कोणी कर्तव्यात कसूर केला ? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !