महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना राज्याध्यक्षपदी डॉ.अमोल रावते


यावल : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना राज्याध्यक्षपदी यावल येथील डॉ.अमोल गणेश रावते यांची राज्यातील सहा विभागातून बिनविरोध निवड झाली. राज्यांमधील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली.

अशी आहे नूतन कार्यकारीणी
अध्यक्ष- नाशिक विभागातून डॉ. अमोल गणेश रावते (जळगाव), उपाध्यक्ष- अमरावती विभागातून डॉ.अजय अहिरकर (वाशिम), कार्याध्यक्ष- औरंगाबाद विभागातून- डॉ. गणेश शिंदे (औरंगाबाद), महासचिव- पुणे विभागातून अश्रफ अली शेख (कोल्हापूर), सचिव- कोकण विभागातून- डॉ.अभिषेक नागरगोजे (रत्नागिरी), नाशिक विभागातून- डॉ.संकेत पोटे (अहमदनगर), कोषाध्यक्ष- नागपूर विभागातून- डॉ.संदीप तिडके (भंडारा) यांची निवड करण्यात आली. संघटना तयार करण्यासाठी डॉ.शील दुधे (चंद्रपूर), डॉ.संदीप लेकुरवार (वर्धा) यांनी परीश्रम घेतले. डॉ.संग्राम शिंदे (कोल्हापूर) यांचे सहकार्य लाभले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !