भुसावळात लसीकरणप्रसंगी स्लॉटनुसार लाभार्थी उपस्थित न झाल्याने वाढला गोंधळ


भुसावळ : स्लॉटनुसार लाभार्थी उपस्थित न झाल्याने शहरातील डी.एस. हायस्कूलमधील केंद्रावर शनिवारी गोंधळ उडाला. लाभार्थींमधील वाद, गोंधळामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येवू नये म्हणून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व अधिकार्‍यांनी केंद्राला भेट दिल्यानंतर गोंधळ कमी झाला. भुसावळ शहरात शनिवारी लसीकरणासाठी एक हजार 500 डोस उपलब्ध होते. 18 ते 44 वयोगटासाठी एक हजार 200 डोस डी. एस. हायस्कूल केंद्रावर तर 44 प्लस वयोगटासाठी 300 डोस नगरपालिका मुख्य रुग्णालयात उपलब्ध होते. सकाळपासूनच या दोन्ही केंद्रावर गर्दी झाली होती. सकाळी सात ते आठ या वेळेत शहरातील विविध पाच आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी टोकन देण्यात आले.

डी.एस.हायस्कूलमध्ये उडाला गोंधळ
या टोकननुसार प्रत्येक केंद्रनिहाय वेळेचे स्लॉट देण्यात आले होते, मात्र यानंतरही बर्‍याच जणांनी नियोजन वेळेपूर्वीच डी. एस. हायस्कूल केंद्रावर हजेरी लावल्याने गर्दी व गोंधळ झाला. गोंधळाची माहिती कळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व पोलिसांच्या पथकाने डी.एस.हायस्कूल गाठत शांतता प्रस्थापीत केली. दरम्यान, लसीकरण केंद्रावर गर्दी व नियमांची पायमल्ली होत असल्याने कोरोना संक्रमण वाढीचा धोका व्यक्त होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !