भुसावळात लसीकरणात उच्चांक : आठ तासांत 4259 जणांना लसीकरण
भुसावळ : भुसावळ शहर आणि तालुक्यात शनिवारी कोरोनाचे रेकॉर्डतोड लसीकरण झाले. शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या आठ तासांमध्ये तब्बल 4 हजार 259 जणांना लसीकरण करण्यात आले. भुसावळ तालुक्यात यापूर्वी 26 जूनला निर्माण केलेला 1944 लसीकरणाचा आपलाच रेकॉर्ड दुप्पटीने उद्दीष्ठ पूर्ण करुन मोडीत काढला. यात भुसावळ शहरात 2876 तर तालुक्यात 1383 जणांना लसीकरण झाले.
लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ शहरात पालिकेने शहरात 18 प्लस वयोगटासाठी 26 जूनपासून डी. एस. हायस्कूलमध्ये स्वतंत्र केंद्र उभारणी केली. पहिल्याच दिवशी या केंद्रावरुन 1127 लाभार्थींना लसीकरण झाले होते. पालिका आरोग्य कर्मचार्यांनी हा आपलाच रेकॉर्ड शनिवारी मोडीत काढून अवघ्या आठ तासांत 1221 जणांना लसीकरण केले. तर रेल्वे हॉस्पीटलनेही 1116 जणांना लसीकरण करुन रेकॉर्ड तयार केला आहे. भुसावळ तालुक्यातील शहरी भागात शनिवारी 2804 जणांनी पहिला तर 72 जणांनी दुसरा अशा 2878 जणांना लसीकरण झाले. तर ग्रामिण भागातील सर्व केंद्रांवर लसीकरणला उत्तम प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ग्रामिण भागातील केंद्रांवर 1 हजार 61 जणांनी पहिला तर322 जणांनी दुसरा डोस घेतला एकूण 1383 जणांना लसीकरण झाले. तर शहर व तालुका मिळन एकूण 4259 जणांना लसीकरण करयात आले आहे.



77 हजार 347 जणांना लस
शहरात आतापर्यंत 62 हजार 808 जणांना लसीकरण झाले आहे. यापैकी 15 हजार 45 जणांनी दुसरा डोसही पूर्ण केला आहे. तर ग्रामिण भागातील 12 हजार 338 जणांना लसीकरण झाले असन आतापर्यंत 2201 जणांना दुसरा डोसही मिळाला आहे. भुसावळ शहर तालुक्यात एकूण 77 हजार 347 जणांना लसीकरण झाले आहे. यापैकी 17 हजार 246 जणांना दुसरा डोसही मिळाला आहे.
ग्रामीण भागात उत्तर प्रतिसाद
भुसावळ शहरासोबत आता तालुक्यातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डोस उपलब्ध झाल्याने तालुक्यातील कुर्हा, काठोरा, पिंपळगाव, तळवले, साकेगाव, साकरी, कंडारी, वराडसीम, सुसरी, टहाकळी आदी केंद्रांवरही लसीकरण झाले.

